बदलापूर घटनेच्या निषेधार्थ इंडिया व महाविकास आघाडीच्या वतीने : ऐतिहासिक बिंदू चौकात ‘ काळ्या फिती बांधून आंदोलन
कोल्हापूर : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ, महिला अत्याचाराविरोधात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने आज (दि.२४)शनिवारी ऐतिहासिक बिंदू चौकात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी सर्वांनी तोंडावर काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला.
आंदोलनात खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, आर. के. पोवार, सुनील मोदी, कॉ. उदय नारकर, कॉ. सतीश कांबळे, बाबा इंदुलकर, शिवाजीराव परुळेकर, रवी जाधव, बाबुराव कदम, , राजू लाटकर, राजाराम गायकवाड, सुभाष बुचडे, अर्जुन माने, ईश्वर परमार, विनायक फाळके, तौफिक मुल्लाणी, शशिकांत खोत, जीवन पाटील, अनिल घाटगे, कॉम्रेड दिलीप पवार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, भारती पोवार, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, मोहन सालपे, रघुनाथ कांबळे, युवराज गवळी, बी. ए. पाटील, बबन रानगे, दत्तात्रय पाटील, शिवाजी कवठेकर यांचेसह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————-
लक्षवेधी फलक : ‘नराधमाना फाशी द्या चिमुकल्याना न्याय द्या, महाराष्ट्राच्या लेकींना छत्रपतींचा कायदा हवा, भीक नको पैशाची सुरक्षितता हवी लेकीची, लबाड लांडग ढोंग करतय ओवाळणीचं सोंग करतय, लाडकी बहीण फक्त प्रसिद्धीसाठी हवी तिच्या सुरक्षेचे काय , अहो मामा लाडक्या बहिणीची लेक सुरक्षित कधी होणार ?,महायुती सरकारचा निषेध असो ‘ असे फलक आजच्या मूक आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते ते लक्षवेधी ठरले.