कोल्हापूर:ता.०३.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवर संचालक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी चे लॉंचिंग करणेत आले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रिम व गाय दूधाची विक्री कोल्हापूर, सांगली, बेळगांव,सिंधुदूर्ग,रत्नागिरी,पूणे व मुंबई, ठाणे जिल्हयाबरोबरच पणजी (गोवा), या ठिकाणी केली जात आहे. सध्या दररोज १४ लक्ष लिटर पर्यंत दूधाची विक्री केली जात आहे. गोकुळच्या गुणवत्तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्याने दुधाबरोबरच गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांना देखील मोठया प्रमाणांत बाजारातून मागणी आहे.
मागील दोन वर्षाच्या काळांत गोकुळने युएचटी ट्रिटेड होमोजिनाईज्ड टोन्ड दूध “सिलेक्ट” या नांवाने गोकुळच्या टेट्रापॅकमधील दुधास चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ग्राहकांकडून होतअसलेने ग्राहकांकडून या दुधाबरोबरच गोकुळची लस्सी व मसाला ताकाचे पॅकींग टेट्रापॅकमध्ये उपलब्ध करून द्यावे अशाप्रकारची मागणी मुंबई ,पूणे व इतर विभागातील ग्राहकांकडून वारंवार केली जात होती. मुंबई व पुणे, इतर मार्केटमधील टेट्रामधील लस्सी व मसाला ताकाच्या मागणीचा विचार करता गोकुळच्या दर्जेदार दुधापासून टेट्रापॅकींगमध्ये ताक व लस्सी पॅकींग करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेत घेणेत आला होता. तेची अंमलबजावणी म्हणून संघाने सध्या मॅंगो व व्हेनीला या दोन प्रकारच्या फ्लेवर मध्ये लस्सीचे २००मि.ली. टेट्रा पॅकमध्ये व मसाला ताकाचे २०० मि.ली. टेट्रामध्ये पॅकींग घेण्यात आले आहे.सदरचे पॅकिंग दि. ०३-०५-२०२३ रोजीपासून बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरच्या लस्सीमध्ये उच्च दर्जाचे फ्लेवर वापरणेत आले असून लस्सी व ताकावर युएचटी ट्रिटेड प्रक्रिया केली असल्यामूळे लस्सी व ताक नॉर्मल टेंपरेचरला १८० दिवस टिकून राहणार आहे. यामूळे संघाकडे शिल्लक राहणाऱ्या दुधाची निर्गत करण्यामध्ये चांगल्याप्रकारे मदत होणार असून सदरची टेट्रापॅक मधील मँगो, व्हेनीला लस्सी व मसाला ताक निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे गोकुळचे चेअरमन श्री. विश्वासराव पाटील (आबाजी) यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले तर आभार संचालक किसन चौगले यांनी मानले.
यावेळी चेअरमन विश्वासराव पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके,युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.