मुंबई :
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे रविवारी दि.११ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत व्हीसीच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमपीएससीची परीक्षा रद्द करून लांबणीवर टाकावी , अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली होती. पुढे कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.