कोल्हापूर :
खाटांगळे फिडरवरील सर्व शेती पंपांना एच. पी.( हाऊस पॉवर) नुसार भरमसाठ बिले येतात.ही बिले रिडींग नुसार व्हावीत,दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आम्ही बिले भरणार नाही, वीज कपात करण्यास वायरमन आल्यास त्यांना बघून घेऊ अशा मागण्या करत संतप्त शेतकऱ्यांनी शाखा अभियंता यांना घेराव घातला,यानंतर महावितरण सांगरुळ कार्यालयाला टाळे ठोकले . मागणीचे निवेदन शाखा अभियंता शुभम जंगले यांना दिले .
खाटांगळे फिडरवरील सर्व शेती पंप कनेक्शन हे एच. पी. नुसार भरमसाठ बिले आली आहेत.ही बिले रिडींग नुसार व्हावीत, काही शेतकऱ्यांचा वापर कमी असतांना त्यांना जास्त वापर असलेल्या शेतकऱ्यांसारखी बिले येतात . तसेच पावसाळ्यात विहिरीवरची मोटरी चालू असतात,व नदीवरचं मोटरी बंद असतात, पण पावसाळ्यात त्यांच्या वापरामुळे नदीबरील मोटरींना बिले येतात .
ज्या ग्राहकांचे कनेक्शन जोडले आहे . त्यांना कनेक्शन रिलीज झाल्यापासून एच.पी. ची बिले चालू झाली आहेत . पण अनेक शेतकरी यांनी मोटर उशिरा बसवली तरीही मोटर जोडलेली नसताना सुद्धा एच.पी. ची बिले दिली आहेत. ती दुरुस्त करण्याची उपायोजना करावी .
खाटांगळे फिडरवरील मोटारीचे बिलावरती मंजूर भार ॲटोमॅटीक बाढून आले आहेत ,आणि एच. पी. नुसार बिल असल्यामुळे मंजूर भार वाढल्याने बिलेसुद्धा वाढून आली आहेत . तेव्हापासूनची बिले दुरुस्त करावी व पुढच्या बिलांत असे होणार नाही अशी उपायोजना करावी,मीटर रीडिंग प्रमाणे बिले यावीत,यानंतर आम्ही बिले भरण्यास तयार आहोत.
यावेळी शेतकरी सर्जेराव पाटील, रंगराव पाटील, धनाजी पाटील, सरदार पाटील ,एम.बी. खाडे, सुनील कापडे, उत्तम कासोटे, पंडित कासोटे, जनार्दन सासणे, वसंत खुपिरेकर ,विलास मगदूम, कृष्णात कासोटे, ज्ञानदेव पाटील शेतकरी उपस्थित होते.
…………………
शुभम जंगले, शाखा अभियंता सांगरूळ,
खाटांगळे फिडरवरील सर्व शेती पंप कनेक्शन हे एच. पी. नुसार बिले होतात.ही बिले रिडींग नुसार व्हावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून या मागणीची निवेदन मी वरती पाठवणार आहे.
………….
उत्तम कासोटे ,सुनील कापडे
शेतकरी सांगरूळ,
सुमारे १०० शेती पंपांना एचपी नुसार बिल येते. लाखो रुपयांचा बुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. ही बिले कमी करून मिळावी, व रीडिंग नुसार बिल व्हावे. एका आठवड्यात दुरुस्ती न केल्यास अधिकाऱ्यांना कोंडून घालू.