दिवंगत आम. पी. एन. पाटील गटाचा रविवारी मेळावा व शोकसभा : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे लक्ष
कोल्हापूर :
काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते, आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील सडोलीकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा व शोकसभा रविवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील विठाई – चंद्राई हॉल, खुपीरे फाटा येथे आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते, आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांचा हा पहिलाच मेळावा होत आहे. मेळाव्यात राजकीय वारसाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. या मेळाव्याला आमदार पी.एन. पाटील समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.