गोकुळ निवडणूक : महाडिकांची मग्रुरी उतरवा
: पालकमंत्री सतेज पाटील
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा करवीर तालुका प्रचार शुभारंभ
कोल्हापूर :
टँकरच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गोकुळला लुटण्याचे काम सुरू आहे. मी सगळ्यांचा बाप आहे, असे म्हणण्याजोगी भाषा कोठून आलीय? गोकुळ दूध उत्पाकांचा पैसा लुटून त्यांना पैशाच्या जीवावर मग्रुरी आली आहे. महाडिकांची ही मग्रुरी उतरवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटीत यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीसाठी संकल्पसिद्धी कार्यालयात आयोजित केलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या करवीर तालुका प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, ठेकेदारांच्या ताब्यातून संघ सामान्यांच्या हातात देण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला निवडून द्या. गोकुळ दूध संघ सर्वसामान्य उत्पादकांच्या मालकीचा करून संघ मोठा करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहे. लोकसभा निवडणुकी वेळीच आम्ही गोकुळ उरलय, ठरवले आहे.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आनंदराव पाटील -चुयेकर यांनी जो उद्देश होता तो उद्देश घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलोय. आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो असून करवीर तालुक्यातील ठराव धारकांनी पॅनेल मागे राहावे.
माजी चेअरमन , ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या कपबशी चिन्हासमोर शिक्का मारून सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचेही भाषण झाले.
याप्रसंगी आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती मीनाक्षी पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, ठरावधारक उपस्थित होते.