स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्वाचे : स्पर्धा परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन करणार मार्गदर्शन ( दर महिन्यास मोफत व्याख्यानाचे आयोजन)

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा म्हणून आता जिल्हा प्रशासन मार्गदर्शन करीत आहे. स्पर्धा परीक्षा तयारी, त्याबाबत आवश्यक माहिती दर महिन्यास व्याख्यान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात नमुद तारखेस सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत हा मार्गदर्शन कार्यक्रम चालणार आहे.

मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे आव्हानेही वाढत आहेत. बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी अपार कष्ट घेत आहेत. या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परिक्षा, त्याचे महत्व हे लहान वयातच समजावे, त्यातून महाविद्यालयीन विद्यार्थीही या क्षेत्राकडे वळावे, याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे शंभराहून अधिक अधिकारी आहेत. हे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परिक्षा, त्यासाठी असणारी पात्रता, त्यासाठी करावी लागणारी तयारी आदींबाबत तर मार्गदर्शन करणार आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे. प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करणार आहेत. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.

दिनांक ०७ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं. ०४.०० वाजता महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मा. श्री अक्षय नेर्ले, निवड आय. आर.एस. व मा. श्री विनायक पाटील निवड उपजिल्हाधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. सबब जास्तीत जास्त विद्यार्थी व परिक्षार्थी यांनी महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!