बीडशेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध सभा : मराठा आरक्षणाची जोरदार मागणी
करवीर :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील बीडशेड येथे निषेध सभा घेण्यात आली. ठिय्या आंदोलन करत एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजेत, आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध असो आदी घोषनाणी परिसर दणाणून गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून निषेध सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी बीडशेड येथील सर्व व्यापारी वर्गाने सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग घेतला.
निषेध सभेत राजेंद्र सूर्यवंशी, बुद्धीराज पाटील, डी.एम सुर्यवंशी, पंढरीनाथ माने, दादासो देसाई, शिवाजी लोंढे , धनंजय खाडे, मुकुंद पाटील, मच्छिंद्र कांबळे, नंदकुमार पाटील, हिंदूराव तिबिले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.
सभेला कोगे ग्रामपंचायत सदस्य करण पाटील, लाल बावटा कामगार संघटनेचे मच्छिंद्र कांबळे, पी. एस.मोहिते ,भगवान जाधव , एकनाथ खाडे, सागर सुर्वे , पोलीस पाटील पंढरीनाथ ताशीलदार पंचक्रोशीतील पदाधिकारी, युवकवर्ग ,सकल मराठा समाजाचे समाजबांधव उपस्थित होते .करवीर पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.