मराठा आरक्षणासाठी १६ जूनपासून आंदोलनाची घोषणा : खासदार संभाजीराजे छत्रपतींचा एल्गार
कोल्हापुरातून होणार आंदोलनाला होणार
कोल्हापूर :
रायगडावर
शिवराज्याभिषक दिन सोहळा पार पडला. यावेळी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६ जूनपासून आंदोलन करण्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. शिवराज्याभिषेक दिनी रायगड येथे आयोजित सोहळ्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला.
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त फुलांची आकर्षक सजावट केली होती. युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन केले. शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून देशभर साजरा व्हावा असे आवाहनही त्यांनी केले.
‘मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून आंदोलन सुरू होईल असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. समाजातील ७० टक्के गरीब मराठा बांधवासाठी आरक्षण आवश्यक आहे. आतापर्यंत खूप सहन केलं, आता गप्प बसणार नाही’असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.
..