शेतकऱ्यांसाठी दिलासादायक : यंदा २०२२ वर्षात मान्सून सामान्य राहाणार
Tim Global :
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
यंदाच्या मान्सून संदर्भात स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने अंदाज वर्तवला आहे. २०२२ वर्षात मान्सून सामान्य राहाणार असून सरासरीच्या ९७ ते १०४ टक्के मान्सूनचे प्रमाण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
स्कायमेट यांच्या अंदाजानुसार यंदा चांगले पर्जन्यमान राहणार असून, एप्रिल महिन्यात मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान वर्तवण्यात येणार आहे.
मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता मात्र नंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
मागील दोन वर्षाचा पावसावर अल निनो वादळाचा परिणाम जाणवला. परंतु यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तितका परिणाम राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मान्सूनच्या मार्गातल अडथळे देखील कमीकमी होताना दिसत आहेत.