मकर संक्रांत : १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येते : दर ७६ वर्षांनी ही तारीख एक दिवसाने पुढे जाते : काही वर्षापूर्वी मकर संक्रांती १० जानेवारी रोजी साजरी होत असे

वाचा अधिक माहिती

Tim Global :

Makar Sankranti 2022 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेषच महत्त्व आहे. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हणून म्हटलं जातं,उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

दक्षिणेत आसाम आणि पोंगलमध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. दर ७६ वर्षांनी ही तारीख एक दिवसाने पुढे जाते. काही वर्षापूर्वी मकर संक्रांती १० जानेवारी रोजी साजरी होत असे. ही तारीख दर ६ वर्षांनी पुढे सरकत आता ती १४ जानेवारीपर्यंत आली आहे. काही वर्षांनी ती १५ जानेवारी देखील होईल.

यंदाच्या वर्षी मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे, याबाबत लोकांचा गोंधळ उडालाय. काहीजण यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला असल्याचं सांगत आहेत. तर काही जण १५ जानेवारीला मकरसंक्रांती असल्याचा दावा करत आहेत. तुमचा सुद्धा या तारखेबाबत गोंधळ उडाला असेल तर इथे जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ वेळ….

यंदाच्या वर्षी सूर्य मकर राशीत १४ जानेवारी (शुक्रवार) रोजी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी हा पुण्यकाळ संपत आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्यास्तापूर्वी होत आहे, म्हणून मकर संक्रांतीची सर्वोत्तम तारीख १४ जानेवारी मानली जात आहे.

२९ वर्षांनंतर जुळून येतोय ‘हा’ दुर्मिळ योगयंदाच्या वर्षीच्या मकर संक्रांतीवर काही विशेष योगायोग घडत आहेत. यावेळी सूर्य आणि शनि एकत्र मकर राशीत असतील. हे संयोजन अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी १९९३ मध्ये या योग घडला होता. त्यानंतर २९ वर्षांनी हा दुर्मिळ योग पुन्हा घडणार आहे.

आधी संक्रांत की किंक्रांत?एकूण तीन दिवसांचा हा सण साजरा करण्यात येतो. या तिन्ही दिवसांचे महत्त्व देखील वेगवेगळे आहेत. संक्रांतीच्या अगोदरचा दिवस हा भोगी म्हणून साजरा करण्यात येतो. हिवाळ्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!