कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील गरोदर माता लसीकरणासाठी सुमारे 68 हजार 348 इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.गरोदर मातांच्या कोविड लसीकरणाबाबत संपूर्ण सनियंत्रण हे जिल्हा व शहर कार्यबल गटांमार्फत केले जाणार आहे.

हे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आजरा-2111, भुदरगड-2654, चंदगड-3289, गडहिंग्लज -3287,गगनबावडा-630,हातकणंगले-8681,कागल-4040,करवीर-8577, पन्हाळा-4463, राधानगरी-3374, शाहूवाडी-3166 आणि शिरोळ-5387 इतके लसीकरण उद्दिष्ट जिल्ह्यातील ग्रामीण भागांसाठी असून, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यांतर्गत येणाऱ्या 9 नगरपालिकांसाठी सुमारे 8 हजार 532 तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 10 हजार 156 असे लसीकरण उद्दिष्ट देण्यात आले आहे. महानगरपालिका वगळता जिल्ह्यात सर्वाधिक हातकणंगले तर सर्वात कमी गगनबावडा तालुक्यासाठी उद्दिष्ट आहे.

या गरोदर मातांच्या कोविड लसीकरणाबाबत संपूर्ण सनियंत्रण हे जिल्हा व शहर कार्यबल गटांमार्फत केले जाणार आहे. तसेच हे लसीकरण गरोदर मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचा निर्वाळा आरोग्य तज्ज्ञांनी दिला असून अधिक माहितीसाठी संबंधित गावातील आशा स्वंयसेविका, अंगणवाडी व आरोग्य सेविका तसेच स्थानिक शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून लसीकरणाबाबत मार्गदर्शन घ्यावे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!