कोल्हापूर :
राज्यात कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या (१४ एप्रिल) मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
अशी खात्रीशीर माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.
वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यातसाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याची राज्य सरकारची तयारी झाली आहे. दरम्यान नागरिकांच्यात लॉकडाऊन कधीपासून होणार याबाबत चर्चा सुरू आहे.
लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातली जाणार नाही, पण कडक निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेच्या प्रवासासाठी मुभा राहणार असल्याचे समजते.
दरम्यान हे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत असण्याची शक्यता बोलले जात असल्याने या काळात गरीब व मजूर कामगारांसाठी काही प्रमाणात पॅकेज देण्याची तजवीज करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा होत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.