कोल्हापूर :
जिल्हयामध्ये 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. जिल्ह्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिने पहिल्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांसाठी येत्या 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात एकूण 21 सत्रात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
जिल्ह्याने या मोहिमेच्या सुरुवातीपासूनच आजारपणाचा व मृत्युचा धोका जास्त असलेल्या 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याचे उदि्दष्ट ठेवून आजअखेर 60 वर्षावरील नागरिकांचा पहिला डोस 82 टक्के व दुसरा डोस 60 टक्के पूर्ण केला आहे. तसेच 45 ते 59 वयोगटामध्ये पहिला डोस 74 टक्के व दुसरा डोस 51 टक्के पुर्ण केला आहे. या वयोगटामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
वयोगटानुसार व विभागानुसार तक्ता खालीलप्रमाणे –
वयोगट/विभाग सत्रानुसार उद्दिष्ट 1 ला डोस प्रमाण 2 रा डोस प्रमाण एकूण
60 वर्षावरील 569295 ४६७६८५ 82 २७६६२१ 60 7४४३०६
45 ते 59 वर्षे 705254 5१८६५२ 74 264969 51 783621
18 ते 44 वर्षे 1852368 70382 4 13221 19 83603
हेल्थकेअर वर्कर (38256) 46857 122 35906 77 82763
फ्रंटलाईन वर्कर (29821) 99459 334 47452 48 146911
एकूण 3126917 1203035 38 638169 53 1841204
पहिल्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सेंटर्स निश्चित करण्यात आले असून 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात एकुण २१ सत्रे सुरु करण्यात येणार आहेत.
अ.क्र. तालूका लसीकरण सत्राचे ठिकाण अ.क्र. तालूका लसीकरण सत्राचे ठिकाण
1 आजरा ग्रामीण रूग्णालय आजरा 7 कागल ग्रामीण रूग्णालय कागल
ग्रामीण रूग्णालय मुरगड
2 भुदरगड ग्रामीण रूग्णालय भुदरगड 8 करवीर उप जिल्हा रूग्णालय गांधीनगर
ग्रामीण रूग्णालय. खुपिरे
3 चंदगड ग्रामीण रूग्णालय चंदगड 9 पन्हाळा उप जिल्हा रूग्णालय कोडोली
प्राथमिक आरोग्य केंद्र कळे
4 गडहिंग्लज उप जिल्हा रूग्णा. गडहिंग्लज
ग्रामीण रूग्णालय नेसरी 10 राधानगरी प्राथमिक आरोग्य तारळे
प्राथमिक आरोग्य वाळवा
5 गगनबावडा प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे 11 शाहूवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव
ग्रामीण रूग्णालय मलकापूर
6 हातकणंगले ग्रामीण रूग्णालय हातकणंगले
ग्रामीण रूग्णालय पारगाव
यु.पी.एच.सी. लालनगर,
( इचलकरंजी ) 12 शिरोळ ग्रामीण रूग्णालय शिरोळ
प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपुर
लसीकरण हे ऑनलाईन पध्दतीने होणार असून निश्चित केलेल्या प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी त्या दिवशी एकुण 200 लाभार्थ्याचे लसीकरण सकाळी 9 ते 5 या वेळेत होईल. या ठिकाणी ज्या दिवशी जी लस उपलब्ध असेल त्यानुसार लसीकरण केले जाईल. सत्र ऑनलाईन दिसत नसल्यास त्या दिवशी सत्र आयोजित केले नाही असे समजण्यात यावे. त्यासाठी लाभार्थ्यांनी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू ॲपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हॅक्सीनचा डोस मिळविण्यासाठी ऑनलाईन बुकींग करुन अपॉईंटमेंट निश्चित करून लस घ्यायची आहे. लसीकरणाच्य स्लॉट ऑनलाईन बुकींगसाठी संध्याकाळी 4 ची वेळ निश्चित केली असून नागरिकांनी या वेळेत अपॉईंटमेंट निश्चित करावी.
अपॉईंटमेंट नसताना विनाकारण लसीकरण सत्राच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये. कोवीड लसीकरण सत्राच्या ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर यांचा अवलंब करणे बंधकारक राहील.
18 ते 44 या वयोगटाचे एकुण उद्दिष्ट 18 लाख 52 हजार इतके असून त्यापैकी पहिला डोस 70 हजार तर दुसरा डोस 13 हजार जणांचा पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.