कुंभीवर दुसरे कोविड सेंटर सुरू लवकर सुरु करावे
राजेंद्र सूर्यवंशी
करवीर :
करवीर तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यामुळे कुडित्रे, कुरुकली, शिंगणापूर, व के आय टी सेंटर अपुरी पडत आहेत.
यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा वेळी रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे . नागरिक व रुग्णांच्या मागणीनुसार कुंभी डी. सी. नरके या ठिकाणी दुसरे सेंटर सुरु करावे, अशी मागणी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी परिस्थिती लक्षात घेऊन सेंटरला मंजुरी दिली आहे. येत्या दोन दिवसात सेंटर सुरू होणार आहे, अशी माहिती राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे.
यावेळी सूर्यवंशी म्हणाले , तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे सकाळपासूनच सेंटरच्या बाहेर रुग्ण बेडच्या वेटिंगला बसत आहेत. सातत्याने पाठपुरावा करून कुंभीवर दुसरे सेंटर सुरू व्हावे, अशी मागणी आपण केली आहे. याबाबत तातडीची बैठक घेऊन प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी 50 बेडच्या सेंटरला मंजुरी दिली असून,याबाबत सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. लवकरच दोन दिवसात कुडित्रे कुंभी वर दुसरे सेंटर सुरू होत असून रुग्णांना आपल्या भागातच उपचार घेता येणार आहेत.
तालुक्यातील सर्व सेंटर ठिकाणी बेड ची संख्या वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .