कोल्हापूर :

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे जिल्ह्यातील 1380 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील या  संस्थांच्या निवडणुका पाच महिने लांबणीवर पडल्या आहेत. शासनाने कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ही स्थगिती दिली आहे.

जिल्हा बँक, साखर कारखाने 6, नागरी बँका 24, पतसंस्था 300, पगारदार संस्था ५३, विकास सोसायट्या 925, औद्योगिक संस्था 29, प्रक्रिया संस्था 13, खरेदी विक्री संघ 12,  मध्यवर्ती ग्राहक संस्था 5, इतर वर्ग संस्था 11 आहेत .

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,  यामुळे  सहकारी संस्थांच्या निवडणुका पाच महिने  पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. सातव्यांदा या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत . आता या निवडणुकांना ३१ ऑगस्ट 2021 स्थगिती  देण्यात आली.  गोकुळ सोडून सहकारातील संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत . उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांचे निवडणुकांना यातून वगळल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ,गोकुळ ची  निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे.

शासनाने प्रथम 18 मार्च 2020 रोजी, निवडणुका 30 जून 2020 पर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर वेळोवेळी वाढ करत आत्तापर्यंत  सगळ्या निवडणुका पुढे टाकल्या आहेत. 24 फेब्रुवारी 2019 रोजी शेवटचा आदेश काढून 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आता 31  ऑगस्ट 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे.

दरम्यान निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक नेते,कार्यकर्ते यांच्या आशा आकांक्षा वर पाणी फिरले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!