कोगे येथे कै.पै.यशवंतराव अतिग्रे फौंडेशनच्या वतीने गुणवंतांचा व शेतकऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील कोगे येथील
कै.पै. यशवंतराव अतिग्रे फौंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रा. पवनकुमार पाटील यांचे समाजप्रबोधनपर व्याख्यान झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आंबूबाई पाटील होत्या. दरवर्षी फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
व्याख्यानप्रसंगी व्याख्याते प्रा. पवनकुमार पाटील म्हणाले, मोबाईलच्या गर्तेतून युवकांनी बाहेर पडावे. घराघरात संवाद वाढला पाहिजे. जोपर्यंत आईच्या हाताचे घट्टे व बापाच्या पायाच्या भेगा वाचता येत नाही तोपर्यंत तुमचं भविष्य घडणार नाही. आजच्या ताणतणावातून दूर होण्यासाठी थोरामोठ्यांची चरित्रे वाचा. आईवडील, गावातील ज्येष्ठ माणसे यांचा आदर करा.
कै.पै. यशवंतराव अतिग्रे फौंडेशनने ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, गुणवंत विद्यार्थी यांचा केलेला सत्कार हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांचे गावातील विविध सामाजिक कार्य समाजाला उपयोगी असेच आहे.
यावेळी वीरेंद्र अतिग्रे, सचिन अतिग्रे, अमोल अतिग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत प्रस्ताविक अध्यक्ष व यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संभाजी मोरे यांनी तर आभार प्रा. बाजीराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमास फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. उन्मेश सुतार, राहुल मिठारी सचिव, ग्रामपंचायत सदस्य करण पाटील, बळीराम चव्हाण, राजाराम चव्हाण, तानाजी मोरे डॉक्टर केदार पाटील, इंजिनिअर अजित नरके, ऍड.बाळासो पाटील, अवधूत पाटील, सतीश भाट ऑडिटर, ओंकार पाटील, विजय मांगोरे, नामदेव घराळ, विशाल इंगवले, साताप्पा सुतार, सरदार पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.