कृषी योजना : 10 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर :
मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक संस्था, मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियांनाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्थांनी दि. 10 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाई अर्ज करावेत, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुळे यांनी केले आहे.
पात्र अर्जांचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषानुसार पहिल्या 60 लाभार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात येणार आहे. यामध्ये 40 शेतकरी उत्पादक संस्था व 24 मुल्य साखळी गुंतवणुकदार यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील फळे,भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपनन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅगनेट प्रकल्प कार्यान्वित. उत्पादन ते ग्राहक अशा एकात्मीक मुल्य साखळ्यांच्या विकासासाठी या प्रकल्पाची आखनी केली आहे. मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.
मॅगनेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश मुल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मुल्यवर्धी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थाचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे.
शेतकरी उत्पादक संस्थाचा क्षमता विकास, काढणी पश्चात सुविधांसाठी अर्थसहाय्य व निवडलेल्या पीकासाठी मुल्य साखळ्या विकसन हे मॅग्नेट प्रकल्पाचे प्रमुख तीन घटक आहेत. प्रकल्पाअंतर्गत विभागातुन पहिल्या टप्यात 4 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 1 सहकारी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्याना प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1 हजार 67 कोटी रुपयांचा असुन त्यापैकी 746 कोटी रु. (70टक्के) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात असणार आहेत. उर्वरित 30 टक्के रक्कम 321 कोटी रुपये राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.
कोल्हापूर विभागातील डाळींब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुलपिके इ. पिकांचा मॅग्नेट प्रकल्पात समावेश आहे. प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षाचा असून सन 2026-27 पर्यंत हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संकेत स्थळावर अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
अर्जदाराची नोंदणी करून अर्ज व मार्गदर्शक सुचना लिंक डाउनलोड करून लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन जमा करावीत. ईमेलद्वारे सादर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून चेकलिष्ट प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह कृषि पणन मंडळाच्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत.