करवीर तालुकास्तरीय कुस्तीस्पर्धेत चारशेपाच मल्लांचा सहभाभ : साठ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, पै. शंकर तोडकर हायस्कूलच्या मार्फत संयोजन

करवीर तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध वजन गटात चारशेपाच मल्लांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला . आंतरराष्ट्रीय नियमानुसार पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे गटवार प्रथम तीन विजेत्या मल्लांना पदक देऊन करण्यात आले . कुस्ती सम्राट पै युवराज पाटील कुस्ती संकुल कुडित्रे फॅक्टरी साईट येथे झालेल्या स्पर्धेला हजारो कुस्ती शौकीनांनी उपस्थिती लावली .

या स्पर्धा फ्री स्टाईल प्रकारात १४, १७ व १९ वर्षाखालील वयोगटात मुले व मुली ग्रीको रोमन प्रकारात १७ व १९ वर्षे वयोगटाखाली मुलांच्यासाठी प्रत्येकी दहा वजन गटात झाल्या .या स्पर्धेतील प्रत्येक गटातून सुवर्णपदक विजेत्या मल्लाची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे .
१४ वर्षाखालील फ्रीस्टाइल मुले
स्वराज पाटील ( ३५ किलो ) रुद्र पाटील (३८ किलो ) करण राऊत (४१ किलो) रणवीर मोरे ( ४४ किलो) प्रणव पोवार (४८ किलो ) वेदांत वाडकर ( ५२किलो ) गुरुराज सावंत (५७किलो ) राजवर्धन जाधव (६२ किलो)सर्वेश कांबळे (६८ किलो )समर्थ पाटील (७५ किलो )
१४ वर्षाखालील फ्रीस्टाइल मुली..
राजनंदिनी नागावे (३० किलो )रोहिणी देवबा (३९ किलो )ज्ञानेश्वरी पाटील ( ४२ किलो )
संस्कृती पेंडुरकर ( ४६ किलो ) ज्ञानेश्वरी पाटील (५८ किलो )
१७ वर्षाखालील फ्रीस्टाइल मुले…
रोहन पाटील (४५ किलो ) संस्कार पाटील (४८ किलो ) शेखर पाटील (५१ किलो ) पृथ्वीराज पाटील (५५ किलो )तय्यब बारगीर (६० किलो )अभिमन्यू कांदळकर(६५किलो )सुजित गिरीबुवा (७१ किलो )सोहम सुतार ( ८० किलो ) अथर्व पाटील (९२ किलो )राजवर्धन पाटील (११० किलो )

१७ वर्षाखालील फ्रीस्टाइल मुली…
कस्तुरी कदम (४०किलो )श्रुती कांबळे ( ४३ किलो )श्रावणी लव्हटे (४६ किलो ) वैष्णवी पाटील (४९ किलो )सुहनी देसाई (५७ किलो ) सृष्टी सातपुते ( ६५ किलो ) समृद्धी कारंडे (६९ किलो )
१९ वर्षाखालील फ्री स्टाईल मुले…
ओम कोईगडे (५७ किलो ) संकेत पाटील ( ६१ किलो ) रितेश पाटील (६५ किलो) पार्थ महाडेश्वर (७० किलो ) समर्थ पाटील (७४ किलो)आदर्श पाटील ( ७९ किलो )हर्षवर्धन पाटील (९२किलो)
१९ वर्षाखालील फ्री स्टाईल मुली
श्रुती सावळे ( ६२ किलो )

१७ वर्षाखालील ग्रीको रोमन मुले…
आदित्य साखरे (४५ किलो ) पार्थ चौगले (४८ किलो) समर्थ पाटील (५१ किलो ) श्रीधर पाटील (५५ किलो)सारंग पाटील (६० किलो) मयूर चौगले (६५ किलो )नवीन पाटील (७१ किलो ) पृथ्वीराज सूर्यवंशी (९२ किलो)
१९ वर्षाखालील ग्रीको रोमन मुले…
प्रणव पाटील (५५ किलो ) सुदेश मिठारी (६० किलो )शुभम सुडके (६३ किलो ) प्रथमेश रानगे (७२ किलो ) शुभम पाटील (७७ किलो )अवधूत माळी (८२ किलो ) जयवर्धन पाटील (८९ किलो) आयुष जाधव (९३ किलो ) श्रेयश खाडे (९७ किलो )
आमदार प्रा.जयंत आसगावकर, युवा नेते देवराज नरके ,हिंदकेसरी दिनानाथ सिंह ,संताजी घोरपडे,कुंभी कासारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, संचालक सरदार पाटील ,उत्तम वरुटे ,बाजीराव शेलार ,अनिश पाटील ,बळवंत पाटील ,राहुल खाडे,विलास पाटील , यशवंत बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर ,सरपंच अश्विनी पाटील ,केरबा माने ,सचिव शिवाजी तोडकर, संचालक अशोक बिरंजे, संचालक ,क्रीडा शिक्षक उपस्थित होते .प्रास्ताविक कुंभीचे संचालक मुख्याध्यापक डॉ. बी.बी. पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!