कोल्हापुरात पूर भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली, दरडी कोसळल्या,कोल्हापुरात पूर भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. २०१९ मध्ये ही पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली, पुलाच्या मोऱ्यांचा आकार, मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण आणि अलमट्टी धरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा विषय झाला.
दिवसात ३२ इंच पाऊस…
उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणले. कोल्हापुरात खूप पाऊस पडला,काही ठिकाणी एकाच दिवसात ३२ इंच पाऊस पडला. काही ठिकाणी दोन दिवसांत ४९ इंच पाऊस पडला.दरवेळी अलमट्टी धरणाचा मुद्दा येतो. वारणा, पंचगंगेचं पाणी आल्यामुळे फुगवटा वाढतो. महामार्ग बंद झाल्याने दूध राज्याच्या इतर भागात पाठवता आले नाही.
जुन्या ब्रिटिशकालीन मोऱ्या बदलणार!
कोल्हापुर जिल्यात अनेक ठिकाणी कमी आकाराच्या मोऱ्या आहेत, सध्या कमी वेळात जास्त पाऊस पडतो. गाळ, झाडं वाहून आल्याने या मोऱ्या बंद होतात. आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील. पावसाळा संपला की बॉक्स किंवा स्लॅब प्रकारचे पूल बांधले जातील,असे ते म्हणाले.
अतिक्रमणांवर कारवाई होणार?
कोल्हापूरमध्ये नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री पवारांनी यावेळी जाहीर केले,