करवीर :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील हिंदवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गटातील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेत म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले तर राशिवडेचा शिवगर्जना स्पोर्ट्स उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक विभागून मावळा सडोली खालसा व शिवप्रेमी शिरोली पुलाची या संघांना देण्यात आला.
हिंदवी क्रीडा मंडळाने ग्रामीण भागात अत्यन्त नियोजनबद्ध व देखणे मॅटवरील कब्बड्डी मैदान तयार केले होते. रात्रीच्या वेळी संपूर्ण स्पर्धा असल्याने आयोजकांच्या वतीने आकर्षक लाईट सिस्टीम करण्यात आली होती. प्रेक्षकांना बसण्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारली होती. स्पर्धेच्या नियोजनाचे सर्व प्रेक्षकांकडून कौतुक होत होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास १५००० बक्षीस व चषक, द्वितीय क्रमांकास १०००० बक्षीस व चषक तर तृतीय क्रमांकास ७००० बक्षीस व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेदरम्यान गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, सरदार पाटील, सचिन पाटील, नंदकुमार पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, एस.के. पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, एपीआय शिवाजी पाटील, पीआय संजय पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक, ग्रामस्थ व कब्बड्डी प्रेमी उपस्थित होते.