डी.सीं.चे विचार अध्यक्ष नरकेंनी बासनात गुंडाळले : बाळासाहेब खाडे
कोल्हापूर :
डी.सीं. स्वतः डबा घेऊन यायचे, काटकसरीकडे कटाक्ष होता. कारखान्यात कोणाही राजकीय व्यक्तीला आणले नाही. मात्र चंद्रदीप नरकेंनी राजकीय सभाच घेतली. गाडीचे डिझेल, ३ ड्रायव्हरचे पगार ६० हजारचा कारखान्याच्या पैशातून करणारे आणि सभासदांना, युवकांना ऊस तोडायला लावणाऱ्या, कामगारांची होरपळ करणाऱ्यांनी डी.सीं.चे विचार सांगू नये. त्यांचे विचार अध्यक्ष नरकेंनी बासनात गुंडाळले असल्याची टीका बाळासाहेब खाडे यांनी केली.
खुपिरे येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या सभेच्या अध्यक्षस्थानी रणजित पाटील होते. यावेळी
यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, सत्ताधारी म्हणून आमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर चंद्रदीप नरकेंनी अजूनही दिले नाही. वर्षाला तोटा वाढतच चाललाय. आज- उद्या कारभार सुधरेल म्हणून सभासदानी ३ वेळा सत्ता दिली. पण सुधारण्याचे नाव नाही. उलट कारखाना कर्जात लोटला. त्यामुळे आम्हाला एकदा संधी द्या, कारखाना कर्जमुक्त करू.
शंकरराव पाटील म्हणाले, सभासद – कामगारांचे हित काय झाले नाही पण चंद्रदीप नरकेंना २ वेळा आमदारकी मिळाल्याने त्यांचे हित झाले. केवळ आणि केवळ आमदारकी डोक्यात गेल्याने कारखाना कर्जात बुडाला. शाहू आघाडीला मिळणारा पाठींबा पाहून त्यांना आता पराभव दिसू लागला आहे.
सरपंच दीपाली जाभळे म्हणाल्या, चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेल्याने कारखाना डबघईला आला. राजकारण व मनमानी कारभाराला आळा घासण्यासाठी कपबशीला निवडून देऊन परिवर्तन करूया.
शिवाजी पाटील म्हणाले, शेतकरी व कामगार या दोन्ही घटकाकडे दुर्लक्ष झाले. रोजंदारी नोकरीच्या नावावर युवकांचे करियर उध्वस्त केले जात आहे. वैयक्तिक स्वार्थपोटी कारखान्याचा वापर सुरू आहे.
यावेळी चेतन नरके, प्रकाश देसाई, स्नेहल पाटील, प्रकाश मुगडे,तेजस्विनी पाटील, आकाराम पाटील, बबलू पाटील, दादू कामिरे, बाजीराव देवाळकर आदिनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचा भाडीमार केला. हिंदुराव पाटील, सर्जेराव हुजरे, सुभाष निकम, एस.डी.पाटील, पी.बी.पाटील, राजेंद्र पाटील, सभासद उपस्थित होते.