कोगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

    करवीर : 

       रोटरी क्लब ऑफ शिरोली एम आई डी सि कोल्हापूर पुरस्कृत , रोटरी ग्राम समाज सेवा केंद्र, कोगे व श्री क्षेत्र कणेरी मठ यांच्या संयुक्त सहकार्याने कोगे (ता.करवीर) येथील कन्या व कुमार विद्या मंदिर, कोगे  येथे संपन्न झाला.   

या शिबिरात कुमार विद्या मंदिरमधील 223 व कन्या विद्या मंदिरच्या मुली 195 , न्यू इंग्लिश स्कूल कोगे मुले व मुली 186 तसेंच गावकरी 186 असे एकूण 754 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

यावेळी प्रेसिडेंट विजय चौगले यांनी, गेले दोन वर्षे कोरोनामुळे सर्व विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यावरती परीणाम होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना काळजी घेण्यास सांगितले .
या शिबिरात प्रेसिडेंट श्री विजय चौगुले , सेक्रेटरी मिलिंद जगदाळे , डायरेक्टर सुनील जाधव, संजीव परीख बळीराम वराडे व ग्राम समाज सेवा केंद्राचे प्रेसिडेंट तानाजी मोरे, सेक्रेटरी बाजीराव साठे -पाटील , सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील डे. सरपंच बाजीराव निकम व ग्रामपंचायत सदस्य करण पाटील व सभासद अर्जुन हारूगले, रोहित घराळ किरण मोरे , सारंग सातपुते व डॉ. श्रद्धा मोरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!