गोकुळची दूध वाढ गुणवत्‍ता सुधारणा कार्यशाळा संपन्‍न…..

कोल्हापूर:ता०५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत संघाचे वरिष्‍ठ अधिकारी, संकलन विभागाचे सुपरवायझर यांची संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय ये‍थे तालुकानिहाय कार्यशाळा घेण्‍यात आली. माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील व गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ म्हणाले कि “गोकुळने दुधाच्‍या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. उच्च प्रतीचा दूध आणि दर्जेदार दुग्धजन्यपदार्थ हे गोकुळचे वैशिष्ट्य आहे. गोकुळबद्दलचा हा विश्वास ग्राहकांत आणखी वृद्धीगंत करताना दुसरीकडे जनावरांचे उत्तमरित्या संगोपन, योग्य आहार व दुधाची गुणवत्ता वाढ या त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. विशेषत संघाच्‍या सुपरवायझरांनी गोकुळच्या दूध उत्पादन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे. त्यांनी गावोगावी शिबिर घ्यावीत. गायी-म्हैशींच्या गोठ्यापर्यंत जाऊन दूध उत्पादकांना मार्गदर्शन करावे. गोकुळ दूध संघाने २०लाख लीटर संकलनाचा मानस केला असून गोकुळ ब्रँन्‍ड हा म्‍हैस दुधासाठी व त्‍यांचा गुणवत्‍तेसाठी प्रसिध्‍द आहे. असे मार्गदर्शन माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले, “सुपरवायझरांनी पांरपारिक कामाच्‍या पध्‍दतीत बदल करून मायक्रोप्लॅनिंग करुन काम केले पाहिजे.सुपरवायझर व दूध उत्‍पादकांचे दृढ संबंध असल्‍यामुळे आजपर्यंत गोकुळची यशस्‍वी वाटचाल सुरू आहे. सुपरवायझरांना जे कामाचे जे लक्ष्य दिलेले आहे, ते पूर्ण करुन गावपातळीवरील संस्‍थेमधील जनावरांचा सर्व्हे, मोठे दूध उत्‍पादक यांच्‍यावर लक्ष केंद्रित करणे महत्‍वाचे आहे असे मार्गदर्शन केले.

यावेळी प्रास्ताविक करताना चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि “गोकुळच्‍या दूध उत्‍पादकांसाठी संघामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भविष्यात या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी गोकुळच्या प्रत्येक घटकाची आहे. दूध उत्‍पादन वाढीवर भर द्यावा. जिल्ह्यातील व सीमा भागातील दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्‍न गरजेचे आहेत. ज्‍यामुळे भविष्‍यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्‍य होईल.’

या कार्यशाळेवेळी जिल्ह्यातील संकलन विभागाचा तालुका वाईज आढावा घेण्‍यात आला. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आभार मानले.

यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील,माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अभिजीत तायशेटे,अजित नरके,नवीद मुश्रीफ,शशिकांत पाटील, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरीशसिंह घाटगे,तज्ञ संचालक विजयसिंह मोरे,शासन नियुक्त मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही तुरंबेकर, सहा.व्‍यवस्‍थापक बी.आर पाटील, सहा.व्‍यवस्‍थापक दत्‍तात्रय वाघरे व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!