नोकरी : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) : २४३९ पदांसाठी भरती
TG Online :
केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . सीआरपीएफने देशभरातील विविध सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २४३९ पदांवर भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. याकरिता उमेदवारांनी सीआरपीएफची अधिकृत वेबसाईट crpf.gov.in वर भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या या रिक्त जागेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
या पदांसाठी (CRPF Recruitment 2021) उमेदवार १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या मुलाखतीला थेट उपस्थित राहू शकतात. तर https://crpf.gov.in/rec/recruitment या अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप (CRPF भर्ती 2021) पाहू शकतात. तसेच उमेदवार https://crpf.gov.in या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २४३९ पदे भरली जाणार आहेत.
CRPF साठी रिक्त जागांचे तपशील
आसाम रायफल्स (AR) – १५६
सीमा सुरक्षा दल (BSF)- ३६५
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – १५३७
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)- १३०
सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) – २५१
मुलाखतीसाठी महत्वाची तारीख
१३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ या तीन दिवसांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
पात्रता….
पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी सीआरपीएफने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ६२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्युटीसाठी एक वर्षासाठी तैनात केले जाणार आहे.
मुलाखत आणि निवड….
सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नियोजित तारीख आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रांसोबत तसेच फोटोकॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.) सोबत आणणे आवश्यक आहे.