आज रविवार दिनांक 15 जानेवारी ईश्वर कृषी प्रदर्शन चा शेवटचा दिवस : आज तांदूळ महोत्सव आयोजित केला आहे
कोल्हापूर :
आज रविवार दिनांक 15 जानेवारी ईश्वर कृषी प्रदर्शन चा शेवटचा दिवस ,यामध्ये तांदूळ महोत्सव आयोजित केला आहे. तांदळाच्या प्रसिद्ध वरायटी आर जे इंद्रायणी सुवासिक, अवनी तांदूळ, प्रसिद्ध वाडा कोलम तांदूळ, सुवासिक मधुमती तांदूळ ,अक्षत तांदूळ पहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन जंगम यांनी केले आहे.

प्रदर्शनात सेंद्रिय गुळ ,केंद्रीय काकवी, सेंद्रिय हळद ,पापडी साठी लागणारा तांदूळ ,देसी सेंद्रिय केळी ,घरातील पेस्ट कंट्रोल करणारे बिनवासाची औषधे ,विविध प्रकारची शेती अवजारे, शेतीविषयक माहिती पुस्तके, बांबू पासून बनवलेला टूथब्रश, घरातील बागेसाठी लागणारी शेती औषधे ,घरातील बागेसाठी लागणारे खते ,शेतीसाठी लागणारी तन नाशके ,कीटकनाशके ,शेतीसाठी लागणारे स्प्रे पंप ,शेतीची उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खते ,संजीवके, ईश्वर कृषी प्रदर्शन मध्ये पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.