रस्त्यावरील खड्ड्यात पणत्या लावून करवीर तालुका भाजपची प्रतिकात्मक दिवाळी : रस्त्याच्या कामाची मागणी करत वेधले लक्ष
करवीर :
करवीर तालुका भारतीय जनता पार्टी, हळदी व परिसरातील ग्रामस्थ यांच्या वतीने करवीर तालुका भाजपा अध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हळदी येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यातील खड्ड्यामध्ये पणत्या लावून प्रतिकात्मक दिवाळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलन द्वारे रस्त्याच्या कामाची मागणी करत लक्ष वेधले.
हळदी ते परिते या कोल्हापूर ते कोकण व गोवा राज्य मार्ग क्र.139 ची गेली तीन चार वर्ष अत्यंत दुरावस्था झाली असून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाला सूचना व निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. रस्ते कामाकडे होणाऱ्या या दुर्लक्षाचा निषेध म्हणून हे आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले.
आंदोलनात बी.वाय.लांबोरे, एम.आर.पाटील कोथळी,आनंदराव चौगले कुर्डू , महीपती पाटील देवाळे,हळदी उपसरपंच बाजीराव पाटील,सदस्य राजेंद्र बन्ने ,प्रशांत कांबळे,दयानंद कांबळे, दत्तात्रय मगदूम, दशरथ पाटील, आत्माराम कुंडलिक पाटील ,एकनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय मगदूम, अशोक कांबळे प्रकाश पाटील,आनंदराव लंबे,संभाजी कामते,अशोक नारायण पाटील माजी सैनिक शंकर पाटील,गजानन सुतार अमृत सुतार, सुशांत चव्हाण, सुरज पाटील, आशुतोष पाडळकर यांच्यासह हळदी आणि परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक सहभागी झाले होते.