राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा शक्ती प्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ,
परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन
कोल्हापूर :
स्वतः च्या आमदारकीसाठी, अध्यक्ष नरके यांनी कारखान्यात राजकारण आणले.
कुंभी कारखान्यावर ३०० कोटींचे कर्ज केले आहे. त्यामुळे कुंभी कारखाना कर्जबाजारी झाला . सर्वजण परिवर्तनासाठी एकत्र आलो आहे . तुमचा नाही तर डी.सी.नरके यांचा कारभार पारदर्शक होता.तुमच्या कारभारात अपारदर्शकता आहे.अशी टीका पॅनेल प्रमुख व गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केली.
कुंभी कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने कसबा बीड ता.करवीर येथे महादेव मंदिरात राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते. जि.प.माजी अध्यक्ष राहुल पाटील, जनसुराज्यचे संजय दळवी, भरत घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी कुंभी कारखान्यावर परिवर्तनाची गरज असून राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले.
ऍड. प्रकाश देसाई म्हणाले, को जन प्रकल्पला आमचा विरोध होता. बोओटी तत्वावर तो चालवा असे आम्ही म्हणत होतो त्याकडे दुर्लक्ष केले. विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले. आमदार पी.एन.पाटील, आमदार विनय कोरे यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. आमदार कोरेंनी बिनविरोधसाठी दिलेला प्रस्ताव नरकेंनी अमान्य केला. त्यांना स्वतः चा स्वार्थ साधायचा आहे.त्यामुळे अशा प्रवृत्तीला घालविण्यासाठी १२ तारखेला भाकरी परतून परिवर्तन करा. असे आवाहन केले.
बाजीराव खाडे म्हणाले, कारखान्याच्या कामगारांवर दबाव टाकून प्रचाराचे कमी करवून घेतले जात आहे. कोणत्याचं बाबतीत नियंत्रण नाही. कारखान्याची रिकव्हरी कमी झाली याचे गोडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला.
जनसुराज्यचे संजय दळवी यांनी बिनविरोधसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण अतिमहत्त्वकांक्षी लोकांनी ते ऐकले नाही. करवीरची सभासद संख्या जास्त आहे त्यामुळे करवीरमधून ताकद लागूदे आम्ही
पन्हाळ्यातून चांगले मताधिक्य देऊ असे सांगितले.
चांगल्या कारभाराचा आभास केला जात आहे. १० महिने पगार नसूनही पोटाला चिमटा देऊन कामगार कारखाना चालवत आहेत. मात्र अध्यक्ष कारखाना सावरताना दिसत नाहीत. स्वार्थी कारभार सुरू असल्याची टीका यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली.
स्वार्थासाठी कारखान्याचा वापर करणाऱ्या प्रवृत्तीला घालवूया. कारखान्याचे डिझेल टाकून गाड्या फिरवणार नाही. कुंभी वाचावा यासाठीच रिंगणात उतरलो आहोत.आम्ही स्वतःची गाडी, घरातील डबा घेऊन कारखान्याचा कारभार करणार असल्याचे उत्तम पाटील शिंगणापूरकर यांनी मत व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले कुंभी कारखाना आर्थिक अडचणीत आला असून कर्जाच्या खाईत लोटला आहे.
या निवडणुकीत सत्तांतर अटळ आहे.
यावेळी संजय दळवी, प्रा. वसंत पाटील, प्रा. टी.एल.पाटील, दादूमामा कामिरे यांची भाषणे झाली.
स्वागत शामराव सूर्यवंशी यांनी केले. अमर पाटील,रसिका पाटील, केडीसीसी संचालिका श्रुतिका काटकर, राजेंद्र खानविलकर, सत्यजित पाटील ,पै.संभाजी पाटील,अविनाश पाटील,नामदेव पाटील,दत्ता पाटील, बाजीराव पाटील, भगवान सूर्यवंशी, सूर्यकांत दिंडे,तानाजी मोरे, सुरेश रांगोळकर, बबलू पाटील, भगवान सूर्यवंशी, चेतन पाटील, सज्जन पाटील, बळीराम चव्हाण, तानाजी मोरे, विजय पोवार, अशोक माने, कृष्णात पाटील यांच्या सह सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.