खुपिरे रुग्णालयाला ऑक्सीजन निर्मिती साठी आ.पी.एन.पाटील यांच्याकडून 50 लाखाचा निधी

कोल्हापूर :

        खुपिरे (ता.करवीर )येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती  प्लांटसाठी  पन्नास लाख रूपयांचा निधी दिला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून  गगनबावड्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देणार ,असल्याचे प्रतिपादन आ.पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केले.

     भारताचे माजी पंतप्रधान कै.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते. यावेळी बोलताना आ. पाटील यांनी कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे खुपिरे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी 50 लाखाचा निधी दिला आहे. तसेच यापूर्वी हसूर दुमाला व खुपिरे येथे रुग्णवाहिका दिली असून गगनबावडा तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देणार असल्याचे सांगितले.राजीव गांधींच्या दूरदृष्टीतूनच आजच्या प्रगत भारताची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गरजूसाठी 25 हजार मास्क व 20 हजार सॅनिटायझरच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले.गतवर्षि आ.पाटील यांनी सत्तर हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप केले होते.

     प्रारंभी कै.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन आ.पाटील व करवीर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील (सडोलीकर),जिल्हा परीषद सदस्य व राजीवजी सुतगिरणीचे अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर),करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,माजी संचालक उदय पाटील,संजय गांधी अनुदान समितीचे अध्यक्ष संदीप पाटील ,जिल्हा परीषद सद्स्य सुभाष सातपुते,माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी,शिवाजीराव कवठेकर यांच्यासह भोगावती साखर कारखाना,श्रीपतरावदादा बँक राजीवजी सुतगिरणी, जिल्हा परीषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!