आम. सतेज पाटील यांचा राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेललाच पाठींबा : वाकरे सभेत राऊसो पाटील यांनी केले अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
कोल्हापूर :
कुंभी कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या पारश्वभूमीवर गेली दोन तीन दिवस आम.सतेज पाटील यांनी नरके पॅनेलला पाठींबा दिल्याच्या खोट्या अफ़वा पसरविल्या जात आहेत. त्यांनी असा कोणताही पाठींबा किंवा कार्यकर्त्यांना संदेश दिलेला नाही. त्यांचा पाठींबा राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेललाच आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमच्या घराण्यानेही एकदा शब्द दिला म्हणजे तो कायम असल्याचा ठाम निर्धार वाकरे येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या जाहीर प्रचार सभेत केला.
यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, पॅनेल प्रमुख बाळासाहेब खाडे, एकनाथ पाटील, दादू कामिरे, बाजीराव खाडे, प्रकाश देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, रसिका पाटील, उत्तम पाटील यांची भाषणे झाली.प्रा.वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला भगवान पाटील, जयसिंग पाटील, संभाजी पाटील, आर.डी.पाटील, विठ्ठल तोरस्कर, हिंदुराव तोडकर, विजय पोवार, सागर सूर्यवंशी यांच्यासह सभासद उपस्थित होते.