असक्षम कुंभीसाठी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेल सक्षम पर्याय : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा दोनवडे येथे प्रचार सभा
कोल्हापूर :
कुंभी कारखाना असक्षम बनला असून तो सावरण्यासाठी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल सक्षम बनले आहे. यावेळी परिवर्तन अटळ आहे. कारखाना वाचवण्यासाठी ऊस उत्पादक सभासदांनी निवडणूक हातात घेतली आहे, असे प्रतिपादन रयत संघाचे संचालक चिंतामण गुरव यांनी केले.
दोनवडे येथे राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या प्रचार सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.आज शिंगणापूर ,हनमंतवाडी, नागदेववाडी, दोनवडे, वरणगे, पाडळी बुद्रुक ,निटवडे या ठिकाणी प्रचार दौरा झाला.
यावेळी गुरव म्हणाले, दोनवडे गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये गट विस्कळीत झाला होता, मात्र कुंभी कारखान्याच्या निवडणुकीसाठी पुन्हा एक दिलाने ताकतीने आम्ही एकत्र आलो आहोत.
ग्रामपंचायत माजी सदस्य संभाजी पाटील यांनी कुंभी कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे, कारखाना वाचवण्यासाठी पूर्ण ताकतीने उतरावे लागणार आहे, यापूर्वी दोनवडे गाव ७५ टक्के सत्ताधारी गटाकडे होते, यावेळी मात्र ७५ टक्के शाहू आघाडीबरोबर असणार आहेत.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी ,प्रकाश देसाई यांचे मनोगत झाले. स्वागत एस.एम.पाटील यांनी केले. यावेळी उमेदवार यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील, बाजीराव खाडे, सर्जेराव पाटील , सुभाष पाटील, प्रा. बाजीराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नागेश पाटील, बाळासो पाटील, आनंदा कदम ,शहाजी पोवाळकर ,बाजीराव पाटील, माजी सरपंच सरदार पाटील, राजाराम कदम, राऊसो कळके, नवनाथ कदम, पदाधिकारी ग्रामस्थ सभासद उपस्थित होते.