५९८ विक्रमी अर्जाची विक्री,आज ८७ अर्ज दाखल,एकूण १६० अर्ज दाखल
कोल्हापूर :
कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ५९८ विक्रमी अर्जाची विक्री झाली. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ८७ अर्ज दाखल झाले आहेत.तर ५९८ अर्जांची विक्री झाली आहे. आज विरोधी शाहू आघाडीतील या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

दिनांक ९ रोजी ७१,दिनांक १० रोजी ८७ अर्ज असे एकूण १६० अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवार १० रोजी शाहू आघाडी गटाकडून अर्ज दाखल केले,यामध्ये यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील, कुंभी माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील,माजी उपाध्यक्ष शामराव गोधडे, माजी संचालक सुभाष पाटील, शंकरराव पाटील, बाळ पाटील, डॉ.इंद्रजीत पाटील, रवींद्र मडके, सज्जन पाटील, यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी आज अर्ज दाखल केले.
प्रांत अधिकारी कार्यालय बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली, यावेळी पोलिसांनी व प्रांताधिकारी यांनी सूचक व उमेदवार यांनाच अर्ज भरण्यासाठी बोलवण्यात आले.यामुळे गोधळ टळला होता.
सत्ताधारी नरके गटाकडून बुधवार ११ रोजी अर्ज दाखल होणार आहेत.अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ असून,
अर्जाची छाननी शुक्रवार दि.१३ रोजी होणार आहे.