कुंभी कासारी साखर कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड उद्या
करवीर :
कुंभी कासारी साखर कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड उद्या १२.३० वाजता होणार असून निवडणूक अधिकारी प्रांत अधिकारी वैभव नावडकर काम पाहणार आहेत.
कुंभी कारखान्याची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. या
निवडणुकीत नरके पॅनेलने सर्वच्या सर्व २३ जागा जिंकून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपले वर्चस्व कायम राखले.
आता २०२३ ते २०२८ सालाकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड केली जाणार आहे. अध्यक्ष पदी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे नाव निश्चित असून उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.