कुंभी कारखाना निवडणुकीसाठी ७१ अर्ज दाखल
५०१ अर्जाची विक्री
कोल्हापूर :
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ७१ अर्ज दाखल झाले आहेत.तर ५०१ अर्जांची विक्री झाली आहे.
पहिल्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले . आज दिनांक ९ रोजी ७१ अर्ज असे एकूण ७३ अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवारी १० रोजी शाहू आघाडी गटाकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत, तर सत्ताधारी नरके गटाकडून बुधवार ११ रोजी अर्ज दाखल होणार असल्याचे समजते.
आज विद्यमान संचालक विलास पाटील ,उत्तम वरुटे ,जयसिंग पाटील ठाणेकर, प्रा. टी एल पाटील, यांच्यासह अन्य नेते,कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ असून,
अर्जाची छाननी शुक्रवार दि.१३ रोजी होणार आहे.सोमवार दि. १६ ते सोमवार दि. ३० जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर १ फेब्रुवारी पासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.
रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.