कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता

Tim Global :

आतापर्यंत देशातील सात कोटी जनतेने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.दरम्यान
करोनावर  नियंत्रण आणण्यात लसीकरणामुळे यश आलं आहे. भारतात बहुतांश लोकांना कोवॅक्सिन, कोविशिल्ड तसंच स्पुटनिक या लसी देण्यात आल्या. मात्र आता कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून  NTAGI ने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास करोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ANI Digital
@ani_digital
NTAGI recommends reducing gap between two doses of Covishield: Sources

Read @ANI Story | https://aninews.in/news/national/general-news/ntagi-recommends-reducing-gap-between-two-doses-of-covishield-sources20220320181210/
#COVID19 #Covishield
6:16 PM · Mar 20, 2022
148
See latest COVID-19 info

दरम्यान….भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर दिला जातो. १३ मे २०२१ रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं. सहा ते आठ आठवड्यांच्या अंतरावरुन हे अंतर बारा ते सोळा आठवडे इतकं वाढवण्यात आलं होतं. आतापर्यंत देशातील सात कोटी जनतेने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!