प्रातिनिधिक फोटो

   कोल्हापूर :
  

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास तसेच अद्ययावत क्रीडासुविधा पुरविण्यात येतात. सन 2022-23 या वर्षी राज्यातील 9 क्रीडाप्रबोधिनीमध्ये 19 वर्षाखालील खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंनी दि. 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी  डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

  राज्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, थलेटिक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग,जिम्नॅस्टीक्स, जलतरण व फुटबॉल या खेळप्रकारांचा समावेश असुन या खेळामधील प्रतिभावंत खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या खेळप्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धामधील पदकविजेते तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंची तज्ञ समितीद्वारा चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे. कोल्हापूर क्रिडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती व शुटींग या खेळासाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

   शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत निवासी तसेच अनिवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रेही कार्यन्वीत आहेत. खेळाडूंना  क्रीडासाहीत्य, प्रशिक्षण, गणवेश, राष्ट्रीय स्पर्धासाठीचा प्रवास तसेच पौष्टीक आहार या सुविधा पुरविलया जातात. याप्रकारच्या अनिवासी प्रबोधिनी प्रवेशाकरीता राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेत्या खेळाडूंची विविध कौशल्यचाचणीद्वारे निवड केली जाणार आहे.   क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडू हा 19 वर्षाखालील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

   क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडूकडे सहभागी झालेल्या राज्य, राष्ट्रीय, अंतराराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका/ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र  असणे आवश्यक आहे.

  पात्र खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, अंतराराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका/ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र  जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात दि. 15 फेब्रुवारी 2022 पुर्वी अर्ज दाखल करावा. अर्जात खेळाडूचा संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता, ई मेल आयडी नमूद करावा, असेही त्यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!