नवीन वर्षात ‘गोकूळ’ २० लाख लिटर दूध संकलनांचा टप्पा पूर्ण करेल : चेअरमन विश्वास पाटील (आबाजी )

कोल्‍हापूर :

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर.(गोकुळ) संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांनी संघाचे दूध उत्‍पादक, प्राथमिक दूध संस्था, अधिकारी, कर्मचारी, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि उत्तम प्रतीचे दूध, गुणवत्तापूर्ण उत्पादने यामुळे बाजारपेठेत ‘गोकुळ ब्रँड’निर्माण झाला आहे. गोकुळ ब्रँड निर्माण करण्याचे सर्व श्रेय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे, ग्राहकाचे व्यवस्थापन वर्गाचे आणि सभासदाभिमुख कामकाज करणाऱ्या संचालक मंडळाचे आहे. भविष्यकालीन वाढ आणि विस्तार विचारात घेत संचालक मंडळाने सभासद हिताच्या विविध योजना आखल्या आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असुन. ‘गोकुळ’ ने नजीकच्या काळात वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या गोकुळचे दूध संकलन सतरा लाख लिटरपर्यंत पोहचले आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत गोकुळच्या दूध संकलनात प्रतिदिन सरासरी तीन लाख लिटर दुधाची भर पडली आहे. या दुधामध्ये म्हैस दुधातील वाढ हि दिलासादायक आहे. याचे सर्व श्रेय संघाचे दूध उत्पादक व गोकुळ संबधित सर्व घटकांना जाते.

वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केल आहे. यासाठी म्हैस दूधवाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत जातिवंत जनावरांचे पालन पोषण, गोठा व्यवस्थापन, आहार संतुलन, पशुखाद्य वापर, जंत निर्मूलन लसीकरण यावर विशेष लक्ष दिले आहे. मुंबई,पुण्यासह कोकण भागातून गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. ‘गोकुळ’ च्या उत्पादनांना वाढती मागणी आहे. याचा विचार करता भविष्‍यात ग्राहकांना गोकुळची चिज, आईसक्रिम, टेट्रापॅक मधील सुगंधी दूध व ताक हि नवीन उत्पादने ग्राहकांच्या सेवेत लवकरच उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत तसेच राज्‍यातील महत्‍वाच्‍या पर्यटनस्‍थळी गोकुळचे दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्‍ध होण्‍याकरिता नवीन आकर्षक अशा गोकुळ शॉपी उभारण्‍यात येणार असल्‍याची माहिती दिली.

      गोकुळच्या नवीन वर्षातील योजना गोकुळच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्या साठी  भारत सरकारने FSSAI प्रमाणित केलेल्‍या BIS लायसन्‍स घेणे. NDDB च्या सहकार्याने वांझ जनावरे गाभण राहण्‍याकरिता  फर्टीमिन फिडची उत्‍पादन व चाचणी करण्‍याचा  तसेच जनावराच्‍या शरिरातील उर्जा व दूध वाढीसाठी अर्ली टीएमआर पशुखाद्याची निर्मिती करणेचा मानस आहे.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!