तरुणांना ऊर्जा देणारी बातमी : रस्त्यावर कचरा गोळा करणारा ऑलिम्पिक पदक विजेता झाला

टोकियो :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडूंनी विश्वविक्रम करत पदके जिंकली, तर काहींचे अनुभव, इतरांसाठी प्रेरणादायी ठरले . ऑलिम्पिकमध्ये असे अनेक खेळाडूी असतात की ज्यांचा पदक जिंकल्यानंतर संघर्ष वाचला जातो. त्यातीलच एक नाव म्हणजे फिलिपिन्सचा कार्लो पालम बॉक्सिंगपटू पालमने फ्लाईवेटमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

एकेकाळी रस्त्यावर कचरा गोळा करणारा पालम आता ऑलिम्पिक पदक विजेता झाला आहे. भारताच्या अमित पांघलने बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्याच बॉक्सरला पराभूत करून टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते.

Olympics
@Olympics
It’s another #Boxing medal for #PHI as Carlo Paalam takes silver in the men’s flyweight category!

@OlympicPHI

पदक जिंकल्यानंतर कार्लो पालम सध्या स्वप्नातच जगत आहे. एक काळ असा होता, जेव्हा तो रस्त्यावर कचरा उचलायचा आणि कदाचित त्याला त्यावेळी ऑलिम्पिकबद्दल माहितीही नव्हते.

१६ जुलै १९९८ रोजी बुकिडोंन येथे जन्मलेल्या पालमने बालपण बालिंगाओंमध्ये व्यतीत केले. जेव्हा तो सहा वर्षांचा होता, कार्लोचे वडील त्याला चांगली संधी शोधण्यासाठी कॅगायन डी ओरोस शहरात घेऊन गेले. यानंतर परिस्थिती मुळे कार्लोने कचरा उचलण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला बॉक्सिंगच्या स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले, कार्लोनेही वयाच्या ७व्या वर्षी पहिला सामना जिंकला. मग बॉक्सिंग स्पर्धा जिंकणे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी पोट भरण्याचा एक मार्ग बनला. हा तो काळ होता जेव्हा त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आले.

२००९ मध्ये, पार्क स्पर्धेदरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याला कॅगायन डी ओरोस बॉक्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट केले. २०१३मध्ये, कार्लोचा फिलिपिन्सच्या राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आणि येथून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली.आता
पालमने फ्लाईवेटमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!