गोकुळ निवडणूक : संग्रामसिंह कुपेकर गटाचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठींबा
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघत असून शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या गटाचा पाठिंबा सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला जाहीर केला.

कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे संग्रामसिह कुपेकर यांच्या निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघातील संग्रामसिंह कुपेकर गटाच्या गोकुळ दूध ठराव धारक व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री भरमु आण्णा पाटील,माजी आमदार संजय बाबा घाटगे,रणजित पाटील मुरगुडकर, सम्राट महाडिक,भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, प्रकाश चव्हाण,सदानंद हत्तरगी,भरमांना गावडा,बी.एम.पाटील,भाई वाईंगडे,दिगंबर देसाई,वसंतराव नंदनवाडे,राजन महाडिक,सदानंद पाटील,उदयकुमार देसाई,
बबनराव देसाई,अरुण पाटील,तानाजी पाटील,प्रकाश दळवी,आनंदराव देसाई,बंडोपंत रावराणे,आनंदराव मटकर, राजू रेडकर,प्रमोद कांबळे,डॉ.अनिल पाटील,अशोक खोत,दत्तू विजणेकर,एन.डी.कांबळे,प्रशांत नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.