कृषी दिनानिमित्त : महे येथे सात हेक्टरवर ७ हजार ७७७ वृक्ष लागवड
करवीर :
१ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील महे येथील ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ७ हजार ७७७ वृक्षांची लागवड करण्यात आली.
महे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर गावच्या पूर्वेला आहे. या मंदिर परिसरातील गायरान जमिनीवर आज सरपंच सज्जन पाटील, उपसरपंच रुपाली बोराटे, ग्रामपंचायत सदस्य एस.डी. जरग, पांडूरंग पाटील, सचिन पाटील, बाजीराव जरग, पोलीस पाटील इंदुबाई हुजरे, माजी सरपंच सर्जेराव हुजरे, सचिन पाटील , दत्ता शिंदे , वनरक्षक आनंदा बरगे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड हाती घेण्यात आली.