कुडीत्रे गावातील बस सेवा पूर्ण बंद : केएमटी प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर :
केएमटी प्रशासनाने आजपासून (शुक्रवार)तोट्यातील 10 फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्यापासून कुडीत्रे (ता.करवीर ) गावातील बस सेवा पूर्ण बंद केली जाणार आहे. येथील सर्व तीन खेपा थांबविण्यात आल्या आहेत.
कुडित्रे सह अन्य भागातील 10 फेऱ्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
बस बंद होणारे मार्गातील
रात्री 9.10 वा. ची आर.के.नगर राजारामपुरी, शाहू मैदान,
सकाळी 6.15 वा.ची श्री शाहू मैदान ते मुडशिंगी, रात्री 9.25 वा.ची श्री शाहू मैदान ते कळंबा, सायं.7.55 वा.ची शिवाजी चौक ते कळंबा येथील फेऱ्याचा समावेश आहे.