भरारी पथकाकडून तपासणी
करवीर :
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा भरारी पथकाने अचानक येऊन तपासणी केली. यात वजन काटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे प्रमुख वजनमाप निरीक्षक अरविंद महाजन यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यासाठी भरारी पथक नेमून आदेश दिले आहेत. यापैकी वजनमाप निरीक्षक अरविंद महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रथम लेखापरीक्षक सहकारी संस्था पांडुरंग मोहळकर, करवीरचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, सांगरूळ मंडल अधिकारी सुहास घोदे यांनी अचानक कुंभी कासारी कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी केली.
यावेळी वजन काट्यावर वजन होऊन गव्हाणीकडे गेलेल्या चार ऊसाची वहानांंची वजन पावती ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा वजन केले असता कोणत्या प्रकारची तफावत आढळून आली नाही.
याशिवाय २० किलो प्रमाणे पाच हजार किलो वजनाची प्रमाणीत वजनाने काट्यावर ठेवून पुन्हा तपासणी केली.यातही वजन काट्यात कोणतीच तफावत आढळून आली नसल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.
याशिवाय प्रत्येक वहान चालकाला वजन दर्शविणारे दर्शक केबिन बाहेर लावले आहेत. ऊसाच्या भर व रिकाम्या वहानांचे एकाच वजन काट्यावर वजन होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून कुंभी कासारी कारखान्याचा वजनकाटा बिनचूक असल्याचे प्रशस्तीपत्र,व भरारी पथकाने अहवाल दिला आहे.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, शेती अधिकारी संजय साळवी,दयानंद देसाई सुरक्षा अधिकारी बबन पाटील उपस्थित होते.