राधानगरी :
राधानगरी तालुक्यातील कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात शनिवार दि. ३ एप्रिल ते १२ एप्रिल पर्यंत सुशील पाटील कौलवकर , शंकरराव बाळा पाटील कौलवकर चॅरिटेबल ट्रष्ट व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन कै. पी .बी. एरुडकर युवा मंचच्या वतीने करण्यात आले असल्याचे दिगंभर एरुडकर व सचिन पाटील शिरगावकर ,सुशील पाटील कौलवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसचे समनव्यक सुशिल पाटील कौलवकर यांनी ‘कोरोना ‘ महामारीच्या काळात अनेक नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर महाआरोग्य शिबिर होत आहे. समाजातील
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, गोरगरीब, सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे.
कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातील कौलव, शिरगाव, आवळी बुद्रुक, कसबा तारळे येथे मोफत विविध आजारांवर शस्त्रक्रिया, राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. शिबिराची सुरुवात शिरगाव येथे शनिवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ जोतिर्लिंग देवालयात होणार आहे.मंगळवार दि. ६एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कौलव येथील मारुती देवालय, शुक्रवार दि.९ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शिवाजी चौक परिसर व सोमवार दि. १२एप्रिल रोजी जोतिर्लिंग देवालयात आवळी बुद्रुक सकाळी नऊ वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात फुफ्फुसाचे विकार,हृदय विकार,स्वादुपिंडाचे जंतू संसर्ग,क्षयरोग ,अर्धांग वायू,मेंदूचे विकार,सर्प दंश विंचू दंश,अपेंडीक्स हर्निया,मुतखडा,प्रोस्टेट शस्त्रक्रिया,आतड्याच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया,सांधा बदलणे,लिगामेंट तुटणे,पायांच्या हाडांची उंची कमी होणे,माणक्याची शस्त्रक्रिया,नवजात बालकाची कावीळ,दमा,छातीचे विकार झटके येने कान, नाक ,घसा यासंबधी च्या सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या महाशिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सुशील पाटील कौलवकर व दिगंबर येरुडकर यांनी केले आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये ——
१) कोणत्याही कागतपत्राची आवश्यकता नाही.
२)सर्व प्रकारच्या रोगावर मोफत शस्त्रक्रिया
३) सर्व शत्रक्रिया सुसज्ज हॉस्पिटलमध्ये
४) जेवण रुग्णाच्या खाण्याची रहाण्याची मोफत सोय
५ ) शस्त्र क्रियेवेळी लागणारी किरकोळ औषधे विकत घ्यावी
६ ) शस्त्रक्रिये वेळी नेण्या येण्याची मोफत सोय.
७) शिबीर कौलव, कसबा तारळे, आवळी, शिरगाव परिसरासह तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेता येणार .
८) तालुक्यातील पहिले महाआरोग्य शिबीर
९) गरजू व गरीब लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
१०) कोणत्याही रुग्णाला कधीही लाभ घेता येणार.