देशातले सर्वात प्रभावी आणि जनतेचे कार्य करणारे एकमेव कार्यालय असेल:  आमदार सतेज पाटील ( खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ) 

कोल्हापूर : या कार्यालयात येणारा प्रत्येक माणूस आपला असून त्या सर्वांची कामे केली जातील. देशातले सर्वात प्रभावी आणि जनतेचे कार्य करणारे एकमेव कार्यालय असेल, असे प्रतिपादन  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.

राधानगरीत येथे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.संपर्क कार्यालयाचा शुभारंभ महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते कृष्णरावबापु किरुळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि ऑलम्पिकवीर स्वप्निल कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्याचे राजकारण करत असताना सर्वसामान्यांच्या वेदना आम्ही जाणून आहोत. सर्वसामान्य जनतेला थेट संपर्क व्हावा यासाठी हे कार्यालय आहे. खासदारांच्या माध्यमातून रोजगाराचा मोठा प्रकल्प येथे यावा यासाठी कार्यकर्त्यांनी परिसराचा अभ्यास करून तो सुचवावा. एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दुसऱ्या बाजूला आपल्या मुली सातवी नंतर घरी बसतात त्यांना पुढचे शिक्षण घेता येत नाही,  हे शाहू महाराजांच्या भूमीत होता कामा नये. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे प्रत्येकाने आपल्या गावातील अभ्यास करा. शंभर टक्के मुली शाळेत जातील याची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण शाहू महाराजांचे वारसदार आहोत हे म्हणण्याचा हक्क आपल्याला राहणार आहे. २०२६पर्यंत  आपल्या शंभर टक्के मुली शाळेत असतील अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे. अशा चांगल्या गोष्टी खासदारांच्या माध्यमातून जिल्ह्यात करता येतील अशी व्यवस्था करता येईल. राधानगरी तालुक्याने मतांचा पाऊस पाडण्याचे काम केले. ऑलिंपिक वीर स्वप्नीलचे स्वागत भव्य दिव्य करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करायचे आहे. जेणेकरून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल. या राज्याची सत्ता महाविकास आघाडीची असणे हे आपले ध्येय आहे. उमेदवारी कोणाला हे महत्त्वाचे नाही आपण सर्वजण एकजूट असणे महत्त्वाचे आहे. पुढच्या काळात सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आधार द्यायचा असेल तर एकसंघ  राहून महाविकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून आणूया, स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांनी करवीर आणि राधानगरी तालुक्यावर भरभरून प्रेम केले तेच प्रेम यापुढे निश्चित राहील असा विश्वासही त्यांनी दिला.

खासदार शाहु महाराज छत्रपती यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यटन, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून 24 तास जनतेच्या संपर्कात राहणार असल्याची ग्वाही दिली. 

गोकुळचे संचालक आर के मोरे यांनी अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न आणि दुधगंगा धरणाच्या गळतीची समस्या मांडली. यावेळी जिल्हा बँक संचालक ए.वाय.पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील,गोकुळचे संचालक आर के मोरे,अभिजित तायशेट्ये,गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, शेकापचे एकनाथ पाटील, सुरेश कुसाळे यांची भाषणे झाली. महिला काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया साळोखे, सुधाकर साळोखे, . आर के पोवार,राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, सुरेश चौगले, शामराव देसाई, संजयसिंह पाटील, ए डी पाटील, मधुकर रामाने, . शरद पाडळकर, दयानंद कांबळे, विष्णुपंत एकशिंगे, दत्तात्रय धनगर, पांडुरंग भांदीगरे,भोगावती संचालक अभिजीत पाटील, राजेंद्र कवडे, मानसिंग पाटील, प्रसाद डवर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!