स्व.पी.एन.पाटील यांनी मतांचा विचार न करता गावागावात निधी दिला : राहुल पाटील ( पोहाळे, वाळोली, किसरूळ, काळजवडे, कोलिक, पडसाळी गावांत प्रचार दौरा)
पन्हाळा :
स्व.आम.पी.एन.पाटील यांनी मतदारसंघातील लहान मोठ्या सर्व गावांत विकासनिधी देण्याचे काम केले.
काळजवडे व परिसरातील गावांतही निधी देताना मतांचा विचार न करता विकासाला महत्त्व दिले.
एखाद्या मतदानसंख्या कमी आहे किंवा विरोधकांना मते जास्त व आपणाला कमी मते मिळालेत अशा गोष्टीचा संकुचित विचार न करता गावागावांत निधी देऊन विकासाला प्राधान्य देण्याचे काम केले. हाच विकासाचा दृष्टीकोन घेऊन मला पुढे जायचे आहे, साथ द्या असे आवाहन राहुल पी.पाटील यांनी केले.
काळजवडे (ता. पन्हाळा ) येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी राहुल पाटील यांनी पोहाळे, वाळोली, काऊरवाडी, किसरूळ, काळजवडे, पोंबरे, कोलिक, पडसाळी आदी गावचा प्रचार दौरा केला. दौऱ्यात ग्रामस्थांनी स्व.आम. पी. एन.पाटील, उमेदवार राहुल पाटील यांच्या माध्यमातून वाळोलीत १ कोटी ५० लाख, किसरूळ येथे ५० लाख, छोट्याशा चव्हाणवाडीत विजेचे पोलसाठी २ कोटींचा निधी तसेच अनेक गावात निधी दिल्याचे आवर्जून सांगितले.
गोकुळ संचालक चेतन नरके म्हणाले, कुणीही गाफील राहू नका. कुणाला भेटायचे असेल, कोण सक्रिय नसेल तर तात्काळ सांगा. राहुल पाटील यांना विजयी करायचे आहे एवढे लक्षात ठेवा.
भिकाजी पाटील व बाजीराव पाटील म्हणाले, स्व.पी.एन.पाटील यांनी पन्हाळ्यातील गावांत चांगला निधी देऊन दुर्गम भागाला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही राहुल पाटील यांच्यासाठी सर्वाधिक मते देऊ.
काळजवडे येथे उपसरपंच पी.डी. पाटील, आनंदा सावंत, खंडू मुगडे, सहदेव पाटील, राजाराम पाटील, संदीप कांबळे, संदीप मगदुम यांचेसह राजेंद्र सूर्यवंशी, काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर, शाहू काटकर, पाटपन्हाळा मा. सरपंच संदीप पाटील, उबाठाचे सदाभाऊ पवार, भरत इंजूळकर, युवराज काटकर, दामोदर गुरव, अरुण तळेकर, राजू म्हामुलकर कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.