कोल्हापूर :
(Monsoon)
जिल्ह्यात मॉन्सूनला कालपासून सुरवात झाली. दुपारी आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली. आज शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील कक्षांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अधिकाऱी-कर्मचारी यांना हेडक्वॉर्टर न सोडण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

गेली दोन दिवस मुंबई आणि कोकणात जोरदार बरसला.काल दुपारी आणि सायंकाळी झालेल्या जोराच्या सरींनी शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला. शेतकऱ्यांनीही काही पेरणी पूर्ण केली आहे, त्यांनाही पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरील आज सायंकाळी १० फूट ४ इंच पाणी पातळी होती. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे.
शक्यतो घराबाहेर पडणे टाळा
मॉन्सून असल्यामुळे विजांचा कडकडाट कमी होईल ; पण साधारण ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळे विजेचे खांब कोसळणे, झाडे उन्मळणे, छतावरील पत्रे उडून जाणे, धोकादायक इमारती कोसळणे असे अपघात होऊ शकतात. नागरिकांनी शक्यतो अतितातडीचे काम असल्याशिवाय बाहेर पडू नये. धोकादायक ठिकाणी थांबू नये, असेही आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे.
त्यामुळे तालुक्यांतील आपत्ती व्यवस्थापन कक्षांना अलर्ट राहण्याचा सूचना दिल्या आहेत. मदत कार्यासाठी आवश्यक साधनसामग्री तयार ठेवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेडक्वॉर्टर न सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत.