आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता
कोल्हापूर :
पन्हाळा गडाजवळील पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना शेकडो
शिवकालीन तोफगोळे सापडले.अजूनही तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावनगड बांधला आहे. या गडावर आज शिवकालीन ४०६ तोफगोळे सापडले आहेत.

पावनगड संघटना व वन विभागाच्या वतीने गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू होते.खड्डा काढत असताना महादेव मंदिरा शेजारी हे गोळे सापडण्यास सुरुवात झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. आज पुरातत्व खात्याकडून तोफगोळ्यांचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे.