करवीर :
साबळेवाडी ता.करवीर येथे पती कर्मचारी आणि पत्नी सरपंच झाली. आता पती-पत्नी गाव कारभारी म्हणून काम करणार आहेत. या पती-पत्नी यशाची यांची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या ठिकाणी १९९५ ते २०१५ आरक्षण नुसार ओबीसी स्त्री आरक्षण काढण्यात आले.
संभाजी आंबी ते गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून काम करतात. कोरोना काळात संभाजी आंबी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार ही देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लागल्यानंतर कोणताही राजकीय वारसा आंबी यांच्या मागे नसताना, काँग्रेसच्यावतीने शाहू विकास आघाडी मध्ये संभाजी आंबी यांच्या पत्नी ज्योती आंबी त्यांना ओबीसी मधून उमेदवारी देण्यात आली. सुदैवाने विरोधी गटात
उमेदवार असूनही त्यांनी उमेदवार उभे केले नाहीत. यामुळे ज्योती आंबी या बिनविरोध निवडून आल्या. आणि पहिला विजय त्यांच्या पदरी पडला.
आज सरपंच पदाचे आरक्षण काढल्यानंतर साबळे वाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ओबीसी स्त्री आरक्षण निघाले. आणि ज्योती आंबी यांच्या गळ्यात आपसूकच सरपंच पदाची माळ पडली आणि बिनविरोध नंतर सरपंच पदाचे दुसरे यश मिळाले .यावेळी संभाजी आंबी यांना व पत्नी ज्योती आंबी यांना बिनविरोध निवडणूक होऊन सरपंच पद मिळाल्यानंतर आनंद पारावर झाला.
करवीर तालुक्यात या निवडीची चर्चा सुरू झाली. व ग्रामपंचायत क्लार्क संभाजी आंबी यांना सरपंच झाल्याच्या शुभेच्छा देण्याचे फोन वाजू लागले आहेत.
दरम्यान संभाजी व ज्योती आंबी यांच्याशी संपर्क साधला असता. पती संभाजी म्हणाले मी कर्मचारी म्हणून ग्रामपंचायतीचे काम प्रामाणिकपणे करत राहील.तर सरपंच पदाच्या दावेदार ज्योती आंबी म्हणाल्या गावाच्या विकासासाठी मी काम करत राहील.