पोवारवाडी येथील पोवार कुटुंबाचा आदर्श
करवीर :
वाकरे पैकी पोवारवाडी ता. करवीर येथे आईच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी सुमारे ६१ तरुणांनी रक्तदान केले असून पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेऊन पोवार कुटुंबीयांनी आदर्श निर्माण केला आहे.
स्वर्गीय लक्ष्मी वसंतराव पवार यांची आज प्रथम पुण्यतिथी होती. मुलगा संजय वसंतराव पोवार यांनी अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. परिसरातील सुमारे ६१ तरुणांनी रक्तदान केले.
यावेळी
वसंतराव पोवार,
डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. प्रकाश गाढवे, श्रीदेवी ठाणेकर, अर्पण ब्लड बँक कर्मचारी संजय पोवार, अनुप्रिया शेळके, राहुल जाधव, अक्षय पाटील, सर्जेराव सुर्वे,संदीप पोवार, पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते.