पोत्याला तब्बल ४५ रुपये दर वाढला
हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढले
दोन कंपन्यांनी दर वाढविले
कोल्हापूर :
हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत.एका कंपनीने रासायनिक खताचा दर पोत्याला तब्बल ४५ रुपये वाढविला आहे. आतापर्यंत
दोन कंपन्यांनी खताचे दर वाढविले आहेत,यामुळे कोरोना काळात आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याचे खत दरवाढी मुळे कंबरडे मोडणार आहे. दरम्यान जुन्या दराचे खत शेतकऱ्यांनी दर बघून घ्यावे लागणार आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ८६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामाकरिता ९१ हजार ११४ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला होता. सध्या लागणीचा हंगाम सुरू आहे.शेतकऱ्यांच्या कडून खताची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र कोरोना काळात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे,तर काही कारखान्यांनी उसाची बिले अद्याप दिलेली नाहीत.
अशा वेळी गेल्या महिन्यापासून दोन कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या खताचे दर वाढविले आहेत. एका कंपनीने १०:२६:२६ खताचा दर १२३५ रुपये होता, तो ३५ रुपये ने वाढवून १३३० रुपये केला आहे. या कंपनीने १२:३२:१६ या खताचा जुना दर १३०५ रुपये होता, तो दर तब्बल ४५ रुपये वाढवून १३५० रुपये केला आहे. कृषी अधिकाऱ्याकडून कंपनीशी संपर्क साधला असता नोव्हेंबरपासून दर वाढविल्याचे सांगितले.
दुसऱ्या एका खतदर वाढवलेल्या कंपनीशी संपर्क साधला असता १० : २६:२६ खताचा दर ११७५ जुना दर होता. त्यामध्ये २५ रुपये वाढवून १२०० दर झाल्याचे सांगितले. ऑरगॅनिक कोटिंग मुळे दर वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे.
एका कंपनीचा पोटॅश ( एम ओ पी ) खताचा जुना दर ९०१ होता हा दर २६ रुपये ने कमी होऊन ८७५ रुपये झाला आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी या वाढलेल्या व कमी झालेले दराकडे लक्ष देऊन छापील किंमत पाहून खरेदी करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद कृषी खात्याशी संपर्क साधला असता गेली दोन महिने खतांचे दर वाढले असताना जिल्हा परिषद कृषी खात्याला याबाबत अद्याप माहिती नाही असे सांगण्यात आले. यामुळे शासन व कंपन्या यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले.तसेच जिल्हा परिषद कृषी खात्याकडे जुन्या दराचे खत किती आहे याचा स्ट्रॉंक नसल्याचे निदर्शनास आले .यामुळे जुन्या दराचे खत जिल्ह्यात किती टन शिल्लक आहे असा प्रश्न असून.यातून दर वाढवून खत विकल्यास शेतकऱ्यांची लूट होणार आहे..
चंद्रकांत सूर्यवंशी
जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी
शेतकऱ्यांनी खताचे दर पाहून खत खरेदी करावे.जुन्या दराचे खत वाढीव दराने विकल्यास शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.